पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये आयोजित केलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियान अंतर्गत अखिल मराठा शिक्षण परिषद, पुणेच्या क. भा. हिरे हायस्कूल, पुणे आपल्या विद्यालयास बिबवेवाडी तलुका स्तर प्रथम क्रमांक आणि पुणे जिल्हा स्तर प्रथम क्रमांक मिळाला. गुरुवर दिनांक 24-04-2025 रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी मा. श्री भाऊसाहेब कारेकर साहेब यांच्या हस्ते मा. मुख्याध्यापक श्री माने अजित आणि सर्व शालेय स्टाफ यांना सुपूर्त केला. संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सौ. प्रमिलाताई गायकवाड यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.